My Blog
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
बुधवार, २९ जुलै, २०२०
आज दुपारी 1 वाजता दहावीचं निकाल हा ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
तुम्हाला खालील पैकी एका वेबसाईट वरती दुपारी एक नंतर जायचं आहे.
या आहेत वेबसाईट...
वरील वेबसाईटवर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचं आहे आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे.
तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता, डाऊनलोड करू शकता.
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केबल नेटवर्क ने आपली पाळेमुळे फार खोलवर
रुजवली नव्हती. बहुतेकांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा(ओनिडा,
BPL, सोनी, क्राऊन या कंपनीचे बहुतांशी). दूरदर्शनचं एकच चॅनेल दिसायचं.
नंतर त्यात डीडी मेट्रोची भर पडली. जेव्हा काही कार्यक्रम नसेल तेव्हा
स्क्रीनवर सफेद मुंग्या दिसायच्या.जरा हवेने अँटेना हलला तर चित्र गायब. मग
कोणतरी छपरावर चढून तो ऍडजस्ट करणार आणि त्याला घरातून 'दिसतंय' किंवा
'अजून थोडं सरकव' असा फीडबॅक देणार. कार्यक्रमही आतासारखे पाल्हाळ नसायचे.
आठवड्यातून एकदा प्रसारीत होणारे. त्यांची खूप आतुरता असायची. शक्तिमान,
डक टेल्स, टेल्सपिन, सुराग, राजा अँड रँचो, कॅप्टन व्योम, सी हौक्स ही काही
मोजकी नावे आता आठवतायेत. आतासारखी OTT सुविधा नसल्यामुळे एक जरी एपिसोड
चुकला तरी फार वाईट वाटायचं. शाळेत मित्रांना विचारायचं काय दाखवलं काल? .
मग ते हळहळ व्यक्त करत मिर्च मसाला लावून सांगत. रविवारी संध्याकाळी चार
वाजता मराठी चित्रपट लागायचा. प्रेक्षकांचं आयुष्य सॉर्टेड होतं कारण
पर्याय कमी होते.
मग केबल नेटवर्क आणि कलर टीव्हीचा जमाना आला. भरमसाठ न्यूज, सिने चॅनेल सुरु झाले. २४ तास प्रक्षेपणाची सोय झाल्याने कंटेन्टचा दर्जा खालावला. सिरिअल्स वर्षानुवर्षे चालू लागल्या. 'चार दिवस सासूचे' मालिका चार हजार दिवस झाले तरी चालूच राहिली. मालिकांतली पात्रे मेल्यावर पब्लिक डिमांड वर परत जिवंत होऊ लागली. मधे एकदा प्लास्टिक सर्जरीची लाट येऊन गेली. लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी बदलल्या. रात्री उशिरा पर्यंत जेवणं उरकू लागली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चॅनेल्स वर आवडती मालिका असेल तर एक दुपारी रिपीट टेलिकास्ट वर बघितली जाऊ लागली. या मालिकांतली मोठी मोठी घरं, उंची पेहराव मध्यम व नव-उच्चभ्रूवर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत गेला. मध्यमवर्गाचं जगणं टीव्ही सिनेमाच्या जगात म्हणावं तसं रेखाटलं गेलं नाही.
हाय स्पीड इंटरनेट आणि OTT च्या काळात पुन्हा एकदा टीव्हीचा कायापालट झाला. नविन पिढीला (आणि जुन्यांनाही) कन्टेन्ट महत्वाचा वाटू लागला भले त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी. नेटफ्लिक्स, Prime, हॉटस्टार यासारखी अनेक प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसाठी उबलब्ध झालीयेत. Netflix and Chill तरुणाईत पॉप्युलर झालंय. मल्टिमिडीया कन्टेन्टचा ओघ न संपणारा झालाय. तुम्ही युट्युबवर एक विडिओ बघता बघता असे काही वाहवत जाता कि आपण नेमकं काय पाहण्यासाठी युट्युब उघडलंय याचा विसर पडतो. नेटफ्लिक्सवर आता काय पाहावं हे शोधण्यातच बराच वेळ जातो. न्यूज चॅनेल्स ओपिनियन मेकर्स झालीयेत. एक ठराविक अजेन्डा राबवताना दिसतायेत.
अखंड वाहणाऱ्या माहितीच्या या स्रोतांनी आयुष्य कॉम्प्लिकेटेड केलीयेत.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
dinesh patil
-
आज दुपारी 1 वाजता दहावीचं निकाल हा ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल तुम्ही घरबसल्या पाहू शकता. तुम्हाला खालील पैकी एका वेबसाईट वरती...
-
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केबल नेटवर्क ने आपली पाळेमुळे फार खोलवर रुजवली नव्हती. बहुतेकांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा(ओनिडा, ...